यावल शहरातील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू
यावल : यावल शहरातील व्यास नगरातल रहिवासी असलेल्या तरुणाचा पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे यावल शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. हेमंत यशवंत तळेले (रा.व्यास नगर, यावल) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
नोकरीनिमित्त तरुण पुण्यात स्थायीक
हेमंत तळेले हा तरुण आपल्या आईसह यावल शहरातील व्यास नगरात वास्तव्यास होता मात्र नोकरीच्या निमित्ताने तो दोन महिन्यांपुर्वी पुण्यात गेला. मंगळवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलावर विचित्र अपघात झाला. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला कंटेनरनंतर डिझेल टाकून सुरू करत असताना ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर स्पीडने रिव्हर्स गेला आणि हा अपघात झाला. या अपघातात हेमंत तळेले या तरूणासह इतर दोन जणांचा देखील मृत्यू झाला आहे. एकुलता एका मुलाच्या मृत्यूची वार्ता आईला कळल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला.
15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या धुळ्यातील तरुणाचा मृत्यू
पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघातात मुळच्या धुळ्यातील चेतन सोलंकी याचाही मृत्यू झाला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वीच पुणे शहरात राहायला आला. दररोज प्रमाणे आजही सकाळी तो कंपनीत जाण्यासाठी निघाला होता. गाडीची वाट पाहत होतो मुंबई बंगळूर महामार्गावर उभा होता. परंतु त्याची कंपनीची गाडी येण्याआधीच ब्रेक फेल झालेला हा कंटेनर काळ बनून त्याच्या अंगावर आला. या दुर्दैवी अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


