अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार : भावोजीला अटक


नवी दिल्ली : अल्पवयीन मेहुणीवर सलग चार दिवस बलात्कार केल्याच्या आरोपातून भावोजीला पोलिसांनी अटक केली आहे. ही राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

17 वर्षीय मेहुणीवर अत्याचार
या प्रकरणावर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष कनीज फातमा यांनी सांगितले की, प्रकरण कोटाच्या नयापुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे दीड वर्षापूर्वी आरोपीचे लग्न झालं होतं. आरोपीला दारूचे व्यसन असून तो मोलमजुरी करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली आणि ती विष प्यायली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या 17 वर्षीय मेहुणीला कॉलेजमधून गावात घेऊन गेला. कॉलेजमधून मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या संशयावरून पोलिस पीडित मुलीच्या भावोजीच्या घरी पोहोचले. पोलिस घरी पोहोचताच पीडित मुलगी त्याच्या घरी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !