स्टेट बँकेवर गोळीबारात एक ठार
मुंबई : दहिसरच्या एसबीआय बँकेवर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. हा भाग एमएचबी पोलिसांच्या हद्दीत येतो. सीसीटीव्हीत गोळीबार करणार्या संशयित इसमाचा फोटो सापडला आहे. जखमी झालेल्या संदेश गोमारे (25) या इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या छातीला एक राउंड लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. तो आउट सोर्सिंग कर्मचारी होता. बँकेचा स्टाफ नव्हता. पोलिसांची आठ पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ हे घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीत संशयीत कैद
ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडल्याची माहिती असून याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचा शोध घेत आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

