कालिचरण महाराजांच्या पुन्हा अडचणी वाढल्या : गृह निर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाडांनीही दाखल केला गुन्हा


मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाात आक्षेपार्ह टिप्पणी करणारे तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वादग्रस्त टिकेने कालिचरण महाराज चर्चेत
नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण उदात्तीकरण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर तथाकथित संत कालिचरण याने रायपूरात झालेल्या धर्मसंसदेत आक्षेपार्ह टीका केली होती. ‘कालिचरण याने अशी टीका करून देशवासीयांचा अवमान केला’ असल्याचे म्हणत डॉ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विधानाचेही केले होते समर्थन
आपल्या विधानाच्या समर्थनाबरोबर वाटेत येणार्‍या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली देत आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली असल्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कालिचरण महाराजांविरोधात भादंवि 294, 295(अ), 298, 505(2), 506, आणि 34 ( 34) अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !