नात्याला काळीमा : नराधम पित्याच्या अत्याचारानंतर पीडीतेने दिला बाळाला जन्म … या शहरातील घटना

आरोपी पित्यासह पतीला पोलिसांनी केली अटक : पीडीतेच्या आईचे निधन


पंढरपूर : पिता-पूत्रीच्या नात्याला पित्यानेच कलंक लावल्याची घटना पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये पित्यानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने पीडीता गर्भवती राहिली व त्यातून अल्पवयीन मुलीने बाळाला सोमवारी जन्म दिला आहे. वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या जन्मदात्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

बालिकेची आई मयत : पित्यानेच केला अत्याचार
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन बालिकेची आई मागील दीड वर्षापूर्वी मयत झाली होती. त्यामुळे ती बालिका तिच्या वडिलाबरोबर राहत होती. या दरम्यान वडिलांनी तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. बालिकेस गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलानी तिचा समाजातील मुलाशी विवाह करून दिला. त्यानंतर अल्पवयीन पीडिता आधीच गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीने पीडिता हीस तिचे वडिलांकडे आणून सोडले.

बालिकेने दिला मुलीला जन्म
त्या पीडित बालिकेला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर सोमवारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. ही माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना समजल्यानंतर त्यांनी पीडित बालिकेचा जबाब घेतला. त्यानंतर तिच्या वडील व पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पीडित मुलीवर व तिच्या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !