ब्ल्यू व्हेल गेमने घेतले नाशिकमधील तरुणाचे प्राण


नाशिक : ऑनलाईन ब्ल्यू व्हेल गेमने नाशिकमधील 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुषार जाधव (18) असे मयत तरुणाचे नाव आहे.

फिनाईलचे केले सेवन
तुषार हा गेमच्या आहारी तुषार गेल्याचे समोर आले असून बुधवारी राहत्या घरी एकटा असताना त्याने गेम खेळण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तुषारने चक्क आपल्या दोन्ही मनगटांवर धारधार वस्तूने जखमा करून घेतल्या तसेच फिनाईलचे सेवन करीत घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याचे पालक घरी आल्यानंतर उघडकीस आला. जाधव कुटुंबीय संध्याकाळी जेव्हा घरी आले, तेव्हा घराचे दोन्ही दरवाजे बंद होते. त्यांनी घराची बेल वाजवली अन् दरवाजाही जोरजोराने ठोठावला मात्र आतमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. दरम्यान, प्रमोद जाधव यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला असता त्यांना तुषार गळफास घेतलेल्या मृतावस्थेत दिसून आला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या !
तुषारच्या मृत्यूने गायकवाड मळा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष केंद्रित करत आपली मुले नेमके कोणते मोबाइल गेम्स खेळत आहेत, हे वेळोवेळी तपासणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !