आता बोंबला ! : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाला धक्का ; नवरी निघाली पाच महिन्यांची गर्भवती


नवी दिल्ली : सुखी संसाराची स्वप्न रंगवून बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाने हनीमुनच्या रात्री जोरदार तयारी केली मात्र या रात्री नवरीच्या पोटात दुखू लागताच डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून नवरी पाच महिन्यांची गर्भवती सांगताच नवरदेवाला तर भोवळच आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पतीने पोलिसात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठध्ये ही घटना घडली.

अरे देवा ! : 10 मंत्र्यांसह 20 आमदारांना कोरोनाची लागण 

पती म्हणाला ; माझ्याकडून दहा लाखांची मागणी
पतीचा आरोप आहे की, त्याने जेव्हा पत्नी प्रेग्नेंट असल्याची बातमी सासरच्या लोकांना सांगितली तेव्हा सासरच्या लोकांनी उलट त्यालाच खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर त्याच्याकडून आता 10 लाख रूपयांची मागणी करण्यात आली.





अल्ट्रासाउंड रीपोर्टने केली पोलखोल
आता नवविवाहित तरूण न्यायासाठी मेरठ एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचला. इथे त्याने लिखित तक्रार देत पोलिसांकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेच त्याच्या वडिलांनी सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी त्यांच्या मुलाला म्हणाली होती की, तिच्या पोटात दुखत आहे. पण त्यावेळी हे कुणाच्या लक्षात आलं नाही. पण जेव्हा पतीला संशय आला तेव्हा त्याने याबाबत त्याच्या आईला सांगितलं. त्यानंतर तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. इथे तिचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहिल्यावर पती आणि त्याच्या घरातील लोकांच्या पायाखालची जमिनीच सरकली.

नवरीच्या पोटात जुळे बाळ
अल्ट्रासाउंड रीपोर्टमध्ये पत्नी पाच महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचं समजलं आणि समोर आलं की, तिच्या पोटात जुळे बाळ आहेत. पण महिलेच्या घरच्या लोकांनी हे मान्य करण्यास नकार दिला आणि उलट तरूणालाच फसवण्याची धमकी दिली गेली. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !