चरणमाळ घाटात लाकडाचा ट्रक उलटला : चालक ठार, क्लिनर जखमी
नवापूर : तालुक्यातील चरणमाळ घाटात पिंपळनेरकडून सुरतकडे जाणारा लाकडाचा ट्रक वळण रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून चालक ठार झाला तर क्लिनर जखमी झाला.
ट्रक नियंत्रीत झाल्याने उलटला
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र वळणावर लाकडाने भरलेला ट्रक वळवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकमधील लाकुड रस्त्यावर विखुरले. नवापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार विकी वाघ, नरेंद्र नाईक, प्रतापसिंग वसावे, अलताफ शेख, रणजीत महाले, गणेश बच्छे, प्रसाद खैरणार आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ हलवले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात जखमी ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यृ झाला. चरणमाळ घाटात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे.


