मद्यपी पतीच्या व्यसनाला कंटाळून विवाहितेची चार मुलांसह आत्महत्या


जालना : मद्यपी पतीच्या व्यसन व जाचाला कंटाळून विवाहितने चार मुलांसह आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगावात शुक्रवारी उघडकीस आली. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील एका विहिरीत गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (32), भक्ती (13), ईश्वरी (11), अक्षरा (9), युवराज (7) यांचे मृतदेह आढळून आले आहेत.

कौटुंबिक कलहातून आत्महत्या
मोलमजुरी करणार्‍या ज्ञानेश्वर आडाणीला दारूचे व्यसन जडल्याने कुटुंबात रोज खटके उडत होते. गुरुवारी दुपारी दाम्पत्याचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर विवाहितेने मुलांना सोबत घेत विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी मृत महिलेच्या पतीने शेतात जाऊन पाहिले असता विहिरीत मृतदेह आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन मृतदेह बाहेर काढले. या ठिकाणीच शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर ट्रॅक्टरमधून मृतदेह नेऊन गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गावकर्‍यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. दरम्यान, मृत महिलेच्या पतीस गोंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !