22 वर्षीय तरुणीची वसतिगृहात आत्महत्या
नाशिक : वसतिगृहात राहणार्या 22 वर्षीय तरुणीने ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. श्री सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या मुलींचे होस्टेलमध्ये हिरावाडी येथे ही घटना घडली. श्रृती सुरेश सानप (22) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिनार सावंत यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. होस्टलेच्या एका विद्यार्थिनीने फोन करुन माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रुम नंबर 106 मध्ये श्रृती सानप हिने गळफास लावून घेतल्याने आत्महत्या केली असलीतरी आत्महत्येचे स्पष्ट कारण समोरे आले नाही.

