वन विभागाच्या वृक्ष लागवडीसंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ


रावेर : ‘एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष लागवड’ योजनेवर खर्च झालेला निधी वाया गेला असून लावलेल्या वृक्ष वन क्षेत्रात कुठेही दिसेनासे झाल्याचा आरोप वृक्ष प्रेमींकडून केला जात आहे. या योजने संदर्भात माहिती वन विभागाकडून दिली जात नसल्याने वृक्ष लागवड योजनेत काय गौड-बंगाल ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

योजनेच्या सखोल चौकशीची मागणी
वन विभागाची महत्वाकांक्षी योजना ‘एकच वृक्ष तेरा कोटी लक्ष’च्या माध्यमातून रावेर तालुक्यात लाखो वृक्ष लागवड करून त्यांच्या संवर्धनावर खर्च झाला होता मात्र वन क्षेत्राला याचा कुठलाही लाभ झाला नाही. ही योजना पूर्णपणे फोल ठरली. या संपूर्ण योजनेची चौकशीची मागणी वृक्ष प्रेमींमधून होत आहे.तत्कालीन भाजपा सरकारने राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने नियोजन केले होते. 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी व 2019 च्या पावसाळ्यात 30 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. एकूण 50 कोटींपैकी 28 कोटी 50 लाख वृक्ष वन विभागामार्फत लागवड करण्याचे नियोजन होते परंतु याला रावेर तालुक्यात फारसे यश आलेले दिसत नाही. या योजना कागदोपत्री झाल्याची ओरड असून याची चौकशी होण्याची मागणी वृक्ष प्रेमींमधून होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !