स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्षपदी डॉ.विवेक सोनवणे
मुक्ताईनगर : सामाजिक कार्यकर्ते डॉ.विवेक सोनवणे यांची नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत खासदार राजू शेट्टी यांनी त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.


