भुसावल तहसील माहेश्वरी संघटनतर्फे गरजूंना स्वेटर वाटप
भुसावळ : भुसावल तहसील माहेश्वरी संघटनतर्फे गरजूंना स्वेटर वाटप उपक्रम यावलजवळील जामुनजिरा गावता राबवण्यात आला. आदिवासी वस्तीमध्ये थंडीत कुडकुडणार्या सुमारे 175 बालकांना शाळेचे युनिफॉर्म, नव्या जुन्या साड्या, शर्ट पँटस, लहान-मोठ्या मुलींचे कपडे वाटप करण्यात आले तसेच राजगिरा लाडू, बिस्किटे व पौष्टिक आहार वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास राष्ट्रीय बालविकास सहप्रभारी डॉ.संगीता बियाणी, जिल्हाध्यक्षा राधा झंवर यांची विशेष उपस्थिती होती. संगीता बियाणी यांनी स्वेटर्स, स्कूल युनिफॉर्म्स दिले तसेच सर्व पदाधिकार्यांनी साड्या व कपडे देऊन सहकार्य केले. तहसील अध्यक्षा शामलता लढ्ढा, सचिव राजश्री लढ्ढा, संगठन सचिव वंदना चांडक, उपाध्यक्षा भारती राठी ,सहसचिव शीतल भराडीया, जिल्हा ग्रामविकास समिती प्रमुख शशीकला लाहोटी, तहसील समिती प्रमुख आभा दरगड आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची संकल्पना शीतल भराडीया यांची होती.


