शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू


सोलापूर : शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सानिका सोनार (17), पूजा सोनार (13), आकांक्षा युवराज वडजे (11) असे पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या तिघां मुलींची नावे आहेत. घटनेच्या अधिक तपासासाठी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !