राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांसह सर्व महाविद्यालये या तारखेबाबत राहणार बंद
मुंबई : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याचा मात्र ऑनलाईन पद्धत्तीने शिक्षण सुरू राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
जिल्हानिहाय घेण्यात आला होता आढावा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड-19 परीस्थितीची काल आढावा बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, कला संचालक राजीव मिश्रा उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील या शहरांमध्ये होणार मुसळधार पाऊस
वसतिगृहदेखील राहणार बंद
उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.
संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन
सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन वसतिगृह बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेले पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाहीसामंत यांनी यावेळी केल्या.
