भुसावळात आज पत्रकारांचा सन्मान
भुसावळ : शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिना निमित्त उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार व समाजकार्य करणार्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता येथील पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड.नितीन खरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, गट विकास अधिकारी विलास भटकर, भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार दिनाचे औचित्य साधून यावेळी विविध क्षेत्रात समाज कार्य करणार्या बांधवांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरणासह शहरातील विविध क्षेत्रात सामाजिक कामगिरी करणार्या महिलांनाही नारिशक्ती पुरस्काराने यावेळी गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे पत्रकारदिन प्रोजेक्ट चेअरमन हेमंत जोशी, पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण यांनी कळविले आहे. याप्रसंगी उपस्थितांनी शासनाच्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


