अंतुर्लीतील भिल्ल समाजबांधवांचे प्रशासन निवेदन : तर आंदोलनाचा इशारा
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली गावातील भिल्ल समाज बांधवांनी मुक्ताईनगर तहसीलदारांना विविध मागण्या सोडवण्यासंदर्भात निवेदन दिले. समस्या न सुटल्यास लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
तर तीव्र आंदोलन
निवेदनाचा आशय असा की, भिल्ल समाज हा हातमजुरी करणारा समाज असून अंतुर्लीतील कायम रहिवासी असल्याने गेल्या 25 वर्षांपासून कोणत्याही विकासकामांचा शासकीय निधी भिल्ल समाजबांधवांच्या वस्तीत खर्च झालेला नाही. आदिवासी भिल्ल समाजाचे लोकांचे अद्यापही बीपीएल यादीत समाविष्ट नाही शिवाय कोणत्याही योजनेच्या घरकुलाचा लाभदेखील भिल्ल समाजाला मिळालेला नाही, समाजासाठी दफनभूमीची मागणी करूनही ग्रामपंचायत अंतुर्लीने अद्यापही जागा दिलेली नाही तसेच समाज मंदिर सुद्ध मिळालेले नाही अशा. शासनाने या तत्काळ न सोडवल्यास मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर भिल्ल समाजबांधव छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यांनी दिले निवेदन
आदिवासी एकता परीरषद भारतचे सदस्य सुनील रामदास सोनवणे, विकास वाघ, गणेश भिल्ल, सखाराम भिल्ल, लक्ष्मण भिल्ल, दीपक भिल्ल, कैलास भिल्ल, ज्ञानेश्वर भिल्ल, संजय भिल्ल आणि आणि अंतुर्ली गावाचे आदिवासी भिल्ल समाज उपस्थित होते.


