80 वर्षीय वडिलांनी लग्नाची नोंदणी करताच संतापलेल्या मुलाने केला वडिलांचा खून
राजगुरुनगर : वयाच्या 80 व्या वर्षी जोडीदार हवा म्हणून वडिलांनी नोंदणी केल्यानंतर संतापलेल्या मुलाने वडिलांचा खून (father murder) केला. ही घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात घडली. या घटनेत शंकर रामभाऊ बोर्हाडे (80, वैशांयपन आळी, राजगुरूनगर, ता.खेड) असे खून झालेल्या पित्याचे तर आरोपी शेखर शंकर बोर्हाडे (47) असे अटकेतील मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने खून (Murder) केल्याची कबुली देत फिर्याद स्वःता आरोपीने पोलिस ठाण्यात येऊन दिली.
राग अनावर झाल्याने वडिलांचा केला खून
म्हातारपणात वडिलांनी स्वतःच्या लग्नासाठी वधू-वर सुचक मंडळात विवाह नाव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खून (Murder) झाल्याची घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात घडली. आरोपी मुलाने आधी सुरीने हल्ला केला मात्र त्याला धार नसल्याने घरातील वरवंटा वडिलांच्या डोक्यात टाकला.


आरोपी पोलिसात स्वतःच झाला हजर
या घटनेबाबत खेड पोलिसांनी (Khed Police) दिलेल्या माहितीनुसार, शंकर रामभाउ बो-हाडे यांनी परस्पर वधू-वर सूचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. याबाबत आरोपी मुलगा शेखर बोर्हाडे यांच्याशी वडील शंकर बोर्हाडे खोटे बोलले. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोर्हाडे याने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंट्याने वडील शंकर बोर्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून खून (Murder) केला. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव करीत आहेत.





