जाणून घ्या एका क्लिकवर : राज्यात काय सुरू, काय बंद !


मुंबई : राज्यातील कोरोनाचा होणारा विस्फोट पाहता लॉकडाऊन होणार नसलेतरी कडक निर्बंध लावण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे सरकारने शनिवारी रात्री नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हे राहणार सुरू
लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.
रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.

हे राहणार बंद
15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
सर्व पर्यटन स्थळे बंद
प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
हॉटेल रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.
सरकारी कार्यालयात भेटणार्‍यांना निषेध

जमावबंदीसह संचारबंदी लागू
नव्या नियमावलीनुसार राज्यात पहाटे पाच ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी, रात्री 11 ते पहाटे पाच दरम्यान संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अखेर राज्यात निर्बंध लावले ; एका क्लिकवर जाणून घ्या नियमावली 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !