प्रेमात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीसह प्रियकराने मिळून केला खून
भिवंडी : विवाह झाल्यानंतर चार मुले झाल्यानंतर प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहितेने पतीचा प्रियकराला हाताशी धरून पतीचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टावरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणार्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या आहेत. सलाउद्दीन मोहम्मद युसूफ (42, विठ्ठल नगर) असे हत्या केलेल्या दुर्दैवी पतीचे नाव आहे.
औषध नेण्यासाठी बाहेर नेत केला खून
चार मुलांच्या आईने आपल्या प्रियकर सोबतच्या प्रेमात पतीचा अडथळा ठरत असल्याने गावठी औषध घेण्याच्या उद्देशाने आडवाटेच्या जंगलात नेऊन त्याची हत्या केली होती. भिवंडी तालुका पोलिस ठाणे हद्दीत 4 जानेवारी रोजी खारबाव रेल्वे स्टेशन परीसरातील जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली होती . घटनेचे गांभीर्य पाहता मृतदेहाची ओळख पाठविण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर असताना गणेशपुरी विभाग पोलिस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला असता पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला व त्यानंतर टेलरच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पाटविण्यात आली असता तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबियांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली.

अनैतिक संबंधातील खुनाचा उलगडा
पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती घेतली असता त्याच इमारतीमधील असजद अन्सारी हा व्यक्ती दफनविधी प्रसंगी नव्हता ही बाब समोर आली. त्यांनतर पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली असता त्याचा शोध घेतला असता तो पसार झाला होता. त्यानंतर नारपोली परिसरातून त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. असजद अन्सारी ( वय 32 ) हा विवाहित असून त्याचे मयत सालाउद्दीनच्या 38 वर्षीय पत्नी सोबत मागील सहा महिन्यां पासून अनैतिक संबंध होते.त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून कट रचला असल्याचे तपासात समोर आले.
