रेल्वे प्रवाशाकडून पाच लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त


नागपूर : रेल्वे पोलिस दलाने रविवारी रेल्वेस्थानकावर एका व्यक्तीकडील पाच लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे पकडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रवासी अमरावतीचा रहिवासी असल्याचे समजते.

संशय बळावल्याने करवाई
नागपूर रेल्वेस्थानकावर ट्रेन क्रमांक 0805 विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. 1 वर थांबली होती. या गाडीच्या एच-1 डब्यासमोरून एक व्यक्ती लाल रंगाची ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पदरीत्या जात होती. त्याला ट्रॉली बॅगबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याची सखोल चौकशी करून बॅग तपासली असता घालायचे जुने कपडे, मिठाईचे डबे तसेच रोख रक्कम व सोन्याची बिस्किटे मिळाली. त्याच्यावरील संशय बळावल्याने त्याला अधिक चौकशीकरिता ठाण्यात आणले. तिथे चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव रमेश सिंह (बदललेले नाव) असून रा. अमरावती असल्याचे सांगितले. विशाखापट्टणम येथे लष्करात नोकरी करीत असल्याचे सांगितले. त्याच्या जवळ दोन लाख 63 हजार रोख व पाच लाखांची सोन्याची बिस्किटे आढळली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !