भांडण पाहिल्याचा राग : जळगावात रीक्षा चालकासह दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला
जळगाव : भांडण पाहिल्याच्या रागातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भांडण पाहिल्यामुळे केला हल्ला
बाळासाहेब भाऊसाहेबर कुलथे (35, रा.शिंपी गल्ली, खंडेराव नगर) हा रीक्षा चालक असून शनिवार, 8 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळासाहेब कुलथे हा मित्र दीपक बाविस्कर (खंडेराव नगर) हे दोघे गणेश कॉलनीतील अपना वाईन शॉपकडून घरी जात असतांना त्या ठिकाणी काही व्यक्तींचे भांडण सुरू होते. दोघे जण भांडण सुरू असल्याचे पाहून काय झाले ? हे पाहण्यासाठी गेले असता अज्ञात दोन जणांना याचा राग आला. अज्ञात दोघांनी काहीतरी अज्ञात धारदार शास्त्राने वार करून बाळासाहेब कुलथे आणि त्याचा मित्र दीपक बाविस्करला दुखापत केली. दीपक बाविस्कर हा घटनास्थळाहून पळाला तर जखमी बाळासाहेब कुलथे याला काही नागरीकांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रीक्षा चालक बाळासाहेब कुलथे यांच्या फिर्यादीवरून रविवार, 9 जानेवारी रोजी पहाटे शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.




