चाळीसगावात धावत्या रेल्वेखाली अनोळखीची आत्महत्या


चाळीसगावात धावत्या रेल्वेखाली अनोळखीची आत्महत्या

चाळीसगाव : डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी इसमाने आत्महत्या केली. ही सोमवारी सायंकाळी घडली. अनोळखीची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





धावत्या गाडीखाली केली आत्महत्या
चाळीसगाव डाऊन रेल्वे लाईनवरील किलोमीटर क्रमांक 325/27, 326/01 दरम्यान गाडी क्रमांक 02131 या धावत्या रेल्वेखाली येऊन 45 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याचा घटना सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. मयत पायाने अपंग असल्याचे खबरीत नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख पटत असल्यास चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांशी 9527931920, 02589-223584 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार नागेंश दंदी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !