चिंचोली शिवारातून चोरट्यांनी बैलजोडी लांबवली


जळगाव : तालुक्यातील चिंचोली शिवारातून एका शेतकर्‍याची 30 हजार रूपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीचे शेतकर्‍यांवर संकट
शेतकरी समाधान संतोष जगताप (55, रा.उमाळा, ता.जि.जळगाव) यांचे चिंचोली शिवारातील गावाजवळील बसस्थानकाजवळ शेत आहे. रविवार, 9 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता त्यांच्या मालकीचे दोन बैल त्यांनी त्यांच्या शेतात बांधले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरून नेली. हा प्रकार सोमवार, 10 जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. समाधान जगताप यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गफूर तडवी करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !