युवा लेखक खेमचंद पाटील यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान


यावल : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस 61 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई तरुण भारत आणि अक्षरमंच सामाजिक व संस्कृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने तसेच हाय मीडिया लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार सोहळा ठाण्यातील डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. या कार्यक्रमात यावल तालुक्यातील हंबर्डी येथील युवा लेखक खेमचंद गणेश पाटील यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2022’ ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार मान्यवरांनी प्रदान केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार संजय जी.केळकर, साहित्यीक प्रवीण दवणे, सिने अभिनेत्री संजीवनी जाधव, मराठी हाय मीडियाचे संचालक गंगाधर वारके, तरुण भारतचे संपादक किरण शेलार, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.योगेश जोशी, सचिव हेमंत नेहते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर खेमचंद पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !