एरंडोलजवळ भीषण अपघात : दोघे जागीच ठार


एरंडोल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील (N.H.6) पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघे जागीच ठार झाले. अपघातात कार चालक बाळा (पूर्ण नाव नाही, रा.बिलवाडी, ता.जळगाव) व धनराज बाविस्कर (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू (Death) झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भरधाव ट्रक (Truck) आणि कार (Car) एकमेकावर धडकल्याने हा अपघात (Accident)  झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातात (Accident) तीन जण जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

ट्रक व कार एकमेकांवर धडकल्या
मंगळवार, 11 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगावकडून धुळ्याकडे निघालेला दुधाचा टँकर (क्र.एम.एच.43 वाय.0238) व समोरून आलेली कार (क्र.एम.एच.19 व्ही.9257) मध्ये धडक झाली. या अपघातात (Accident) कार चालक बाळा (पूर्ण नाव नाही, रा.बिलवाडी, ता.जळगाव) व धनराज बाविस्कर (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला तर ज्योती रवींद्र शिंदे (37), ललित रवींद्र शिंदे (29, दोन्ही रा.एरंडोल), जयश्री धनराज बाविस्कर, भारती किरण जाधव, आशुतोष बाविस्कर, सुमनबाई मोतीलाल शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक (Truck Driver) पसार झाला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !