अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला सामूहिक अत्याचार : या राज्यातील घटना
नवी दिल्ली : देशातील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. राजस्थानच्या अलवरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडीतेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परीसीमा
मुलीची ओळख पटली आहे, ती फक्त आई आणि वडील इतकंच बोलू शकते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवली आहेत. अलवरचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम (SP Tejaswini Gautam) यांनी सांगितले की, पाच टीम तयार करण्यात आल्या असून पीडितेच्या काकांच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे कुटुंबीयही जयपूरला पोहोचले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.

पाच पथकांकडून आरोपींचा शोध
सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरुणीच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाची कटू आठवण झाली आहे. त्यानंतर देशात अल्पवयीन मुलींवर होणार्या बलात्कारावरही कडक कायदा करण्यात आला. असे असतानाही मुलींवरील बलात्काराच्या (Rape) घटना कमी झाल्या नाहीत, अलवरमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या (Gang Rape) सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहे. सध्या पीडिता मृत्यूच्या दाढेत आहेत.
