पुणे हादरले : गोल्डमॅनच्या खून प्रकरणातील संशयीतासह वडिलांचा निर्घृण खून
पुणे : गोल्डमॅन सचिन शिंदे यांच्या खून प्रकरणात संशयीत असलेल्या सनी कुमार शिंदे (22) (Sani Kumar Shinde ) या तरुणासह त्याचे वडील कुमार शिंदे (55, रा. लोणीकंद) (Kumar Shinde) यांचा टोळक्याने हल्ला करून खून केला. विशेष म्हणजे सनी शिंदे हा अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. 5 ते 6 जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करून त्याचा खून केला तर मुलाला सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी वार करून त्यांचाही खून करण्यात आला.
लोणीकंद पोलिसांची घटनास्थळी धाव
याबाबत लोणीकंद (Lonikand) पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी गोळीबार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती.

तीन महिन्यांपूर्वीच मयत आला होता जामिनावर बाहेर
सुमारे 3 महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लोणीकंद (Lonikand) येथील शाळेच्या मागच्या बाजूला सनी असताना 5 ते 6 जणांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडिल कुमार हेही मध्ये पडले. हल्लेखोरांनी दोघांवरही वार करुन त्यांचा खून केला व ते पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस (Lonikand Police Station) घटनास्थळी पोहोचले.
