पत्नीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओच ठेवला व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला : कारण ऐकून धक्का बसेल


मुंबई : पत्नी माहेरहून सासरी येण्यास नकार देत असल्याने नवर्‍याने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी 30 वर्षीय आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मालाड पोलिसात दाखल झाला गुन्हा
30 वर्षीय तरुणाने पत्नी आंघोळ करताना तिचे व्हिडीओ शूटिंग केले होते. ही क्लीप त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 28 वर्षीय महिलेचे 2015 मध्ये भिवंडीतील एका तरुणाशी लग्न केले होते. महिलेच्या लग्नात तिच्या वडिलांनी जवळपास 12 लाख रुपये खर्च केले होते आणि 5 लाखांहून अधिक किमतीचे दागिनेही दिले होते. तरीही तिच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते आणि फ्लॅटची मागणी करत असल्याचा पत्नीचा आरोप आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने दोन वेळा घर सोडले. अखेर विवाहिता आई-वडिलांकडे माहेरी परत आली होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !