भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांसह तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनाही कोरोना


भुसावळ : भुसावळ शहराला कोरोनाने घट्ट विळखा घातला असतानाच शनिवारी शहरात रेकॉर्डब्रेक 144 रुग्ण आढळले. त्यात पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, अतिरीक्त तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप चौधरी यांचा समावेश आहे. नव्या बाधितांमुळे सक्रिय रुग्ण संख्या 756 झाली असून ती जिल्ह्यात सर्वाधिक आहे. शनिवारी 21 रुग्णांना डिस्चार्जदेखील मिळाला.

डीआरएम कार्यालय दोन शिफ्टमध्ये
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दक्षता म्हणून रेल्वे प्रशासनाने डीआरएम कार्यालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू केले आहे. सकाळी 8 ते 1, आणि दुपारी 1 ते सायंकाळी 5 अशा या दोन शिफ्ट आहेत. रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील 25 कर्मचारी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून कार्यालयातील गर्दी टाळणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. संशयित कर्मचार्‍याची लगेच तपासणी केली जाते.

आईसह सात वर्षांच्या मुलास संसर्ग
भुसावळ शनिवारी इंद्रप्रस्थ नगर, फालक नगर, काशीराम नगर, कुटे गल्ली, जुनी जीन परिसर, पाटील वाडा, न्यू हूडको, जुने सतारे, महात्मा फुले नगर, 15 बंगला, गुंजाळ कॉलनी, सिंधी कॉलनी, गुरुद्वारा परिसर, नाहाटा नगर, शांती नगर, संभाजी नगर, गडकरी नगर, तापी नगर, गोलाणी कॉम्प्लेक्स, सिद्धी विनायक कॉलनी, गडकरी नगर, लिम्पस क्लबमध्ये रुग्ण आढळले. काशीराम नगरात सात वर्षांचा मुलगा व आई बाधित आढळली. या दोघांनाही सौम्य लक्षणे असून प्रकृती स्थिर असल्याने धोका नाही.

कंडारी सरपंचांना मोठा दिलासा : अपात्रता आदेश रद्द




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !