शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांचे निधन


कोल्हापूर : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. प्रा.एन. डी. पाटील यांची प्रकृती रविवारी अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.



सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म
एन. डी. पाटील यांनी गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी.पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणार्‍या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !