धक्कादायक ! : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत लाखोंच्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला


पुणे : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या यवत येथे ही घटना घडली. चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडत सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक रक्कम पळवली. काही रक्कम काढता न आल्याने एटीएम मशीनमध्ये तशीच राहिल्याचे समजते.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण पवार, सहा.पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलिस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथकालादेखील पाचारण करण्यात आले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !