मोठी बातमी : भाजपा आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला : अटक होण्याची शक्यता
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला असून नितेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला (High Court Refused Anticipatory Bail to Nitesh Rane) असल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याच्या आरोपावरून नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
राणे यांच्याविरोधात दाखल आहे गुन्हा
भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांच्यावर संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सोमवार, 17 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर निकाल देत नितेश राणे यांचा अर्ज फेटाळून लावला (High Court Refused Anticipatory Bail to Nitesh Rane) आहे. त्यामुळे नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याहीक्षणी सिंधुदुर्ग पोलिस अटक करण्याची शक्यता आहे. संतोष परब यांच्यावरील या हल्ल्याच्या मास्टर माईंडला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा (Bjp Mla Nitesh Rane) हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचे म्हटले जात आहे. यानंतर राणेंनी कोर्टात धाव घेतली असलीतरी तेथेही त्यांचा जामीन फेटाळण्यात (High Court Refused Anticipatory Bail to Nitesh Rane) आला.


नितेश राणे अद्यापही पसार
संतोष परब हल्ल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) पसार होते. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर अध्यक्ष पदग्रहण समारोहाच्या वेळी नितेश राणे (Bjp Mla Nitesh Rane) हे समोर आले होते मात्र ते आता कुठे आहेत हे कुणालाही माहीत नाही.
