काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादाच्या भोवर्यात ; म्हणाले ‘मी मोदींना मारु शकतो’
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) मारू शकतो व शिव्यादेखील देवू शकतो, असे विधान त्यांनी केल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टिकेची तोफ डागली आहे. पटोले यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी आता केली जात आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे वाढल्या अडचणी
जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर देशात नव्या वादाला तोंड फुटले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसर्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, मी का भांडतो. गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॉलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला (PM Narendra Modi) शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी (PM Narendra Modi) माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणताना या व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.




त्या वक्तव्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ’मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
पटोले म्हणाले ‘ते’ विधान पंतप्रधानांबद्दल नाही
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात मोदी असे टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत मी बोललेला नाही.