बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत 54 टक्के मतदान


बोदवड : नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे 54 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण चार हजार 951 मतदारांपैकी दोन हजार 231 मतदारांनी हक्क बजावला आहे तर सायंकाळपर्यंत आणखी मतदानाची टक्केवारी वाढण्याची दाट शक्यता आहे.

चार जागांसाठी शांततेत मतदान
बोदवड नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवार निवडणूक होत असून शांततेत मतदान सुरू आहे. प्रभाग क्रमांक दोन, तीन, पंधरा व सतरा या प्रभागांसाठी होणार्‍या निवडणुकीत दोन हजार 593 पुरूष तर दोन हजार 358 महिला मिळून एकूण चार हजार 951 मतदार आपला हक्क बजावत आहेत.

15 उमेदवार निवडणूक रींगणात
बोदवड शहरातील चार जागांसाठी होत असलेल्या निडणुकीत 15 उमेदवार रींगणात आहेत. सकाळी सात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. आठ बुथसाठी 40 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक बुथवर पाच कर्मचारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व तीन शिपाई असेल. प्रत्येक बुथवर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उद्या कळणार निकाल
एकूण 17 प्रभागांसाठी बुधवार, 19 रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी सहा राऊंड टेबल असतील. प्रत्येक राऊंडमध्ये प्रभागनिहाय तीन वॉर्ड व 6 मतदान केंद्रांची मतमोजणी होईल. एका राउंडसाठी सुमारे अर्धा तास याप्रमाणे प्रथम राउंडचा निकाल सकाळी 11 वाजेपर्यंत हाती येईल. अंतिम निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. बोदवड नगरपंचायतीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये लढत होत असून या निवडणुकीत कोण बाजी मारते हे निकालाअंती उद्या स्पष्ट होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !