भुसावळ पालिकेची कच्ची प्रभाग रचना तयार ; आता कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा


भुसावळ : कोरोनामुळे रखडलेल्या पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कच्ची प्रारूप प्रभाग रचना पूर्ण करण्यात आली. नंतर हा आराखडा मुंबईत पाठवला होता. यानंतर अंतीम प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर केला जातो. अद्याप याबाबत आदेश नसले तरी येत्या पंधरवड्यात प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर
पालिकेचा 2016 ते 2021 हा पंचवार्षिक काळ 29 डिसेंबरला संपला. यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली. सध्या कार्यकाळ संपल्यामुळे पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकीसाठी कच्ची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. यानंतर आयोगाच्या कार्यक्रमानुसार अंतीम प्रभाग रचना जाहीर केली जाते. यावर हरकती घेण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र, हा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. यामुळे शहरातील राजकीय क्षेत्राची उत्कंठा वाढली आहे. देशभरात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही स्थिती पाहता लवकरच पालिकांच्या निवडणूका लागतील, असे संकेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !