दहा हजारांची लाच भोवली : पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात


कोल्हापूर : दहा हजारांची लाच घेताना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (35, रा.शिंगणापूर, ता. करवीर) यास एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच बेड्या ठोकल्या. बांधकाम व्यावसायीकाकडे दहा हजार रुपये लाच मागितल्याने एसीबीने सापळा रचून कारवाई केली.,

तक्रारीनंतर सापळा रचून कारवाई
नागाळा पार्कमधील बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर (37, रा. एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क) यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याने त्यांना गुन्ह्याच्या कामात मदत करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच त्याने तपास अधिकारी यांच्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेतली. आणखी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाच्या पडताळणीमध्ये कॉन्स्टेबल मर्दाने याने तपास अधिकार्‍यांसाठी 25 हजारांची लाच स्वीकारल्याचे मान्य करून तसेच दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, संदीप पडवळ, रूपेश माने आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !