INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट : दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद


मुंबई : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट (INS Ranvir explosion) होऊन तीन जवान शहीद झाले. नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे मंगळवारी INS रणवीरच्या अंतर्गत (इंटर्नल) कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दहा जवान जखमी
या घटनेत दहा जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांवर कोलाबा नेवी नगर येथील INHS अश्विनी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी बोर्ड ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !