अपहरण झालेला डुग्गू अखेर सापडला
पुणे : तब्बल तीनशेहून अधिक पोलिसांची फौज ज्याच शोध घेत होती होती डुग्गू उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण हा बालक सापडल्याने त्याच्या माता-पित्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चिमुकला डुग्गू याचे अपहरण झाल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत गुप्तता पाळली होती.
अखेर बालकाला शोधण्यात यश
बुधवारी वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलंय. चतु:श्रुगी पोलिसात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. या मुलाचं कशासाठी अपहरण केलं किंवा का केलं याचं कारण पोलीस शोधत आहेत. गेले आठ दिवसांपासून पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर या मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले.




महापौरांनी मानले विशेष आभार
बालेवाडी परीसरातील अपहरण झालेला चार वर्षीय स्वर्णव चव्हाण बुधवारी सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय? यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणार्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! या या शब्दात महापौर मुरलीधर मोहळ यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.
