धक्कादायक ! : लग्न काही दिवसांवर आले असताना नवरीचा अपघाती मृत्यू
वरवंड : काही दिवसांवर लग्न आले असतानाच घरातच त्याची तयारी सुरू असताना लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या नवरी मुलीचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कौठीचा मळाजवळ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. प्रतीक्षा सदाशीव कांबळे (21) असे मयताचे नाव असून या अपघातात तिचा भाऊ शुभम सदाशीव कांबळे (मलठण ता. दौंड) हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात नवरी मुलीचा मृत्यू
प्रतीक्षा हिचे पुढच्या महिन्यात लग्न ठरले होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती तिचा भाऊ शुभम याच्यासह मोटारसायकलवर गुरुवारी सकाळीच ते पुणे शहरात गेली होते. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी मलठणला (ता.दौंड) घरी परतत असातना वाटेत कौठीचा मळाजवळ एका डंपरने धडक दिली व प्रतीक्षाच्या डोक्याला जबर मार लागला व तीचा जागीच मृत्यू झाला तर शुभम हा गंभीर जखमी झाला. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक मात्र ट्रकसह पळून गेला. आपघाच्या आवाजाने परिसरातील लोक गोळा झाले त्यांनी पोलिसांनी बोलावले. जवळच असलेल्या टोलनाक्यावरील रुग्णवाहितीकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले आणि शुभम याच्यावर उपचार सुरु आहेत.

