वरणगाव नगरपरीषदेवर भाजपातर्फे घंटानाद आंदोलन
10 दिवसात भोगावती नदीचे काम सुरू करण्याची मुख्याधिकार्यांची ग्वाही
वरणगाव : वरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी नगरपरीषदेत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. वरणगाव शहरासाठी भाजपाच्या 24 बाय 7 अशा प्रकारची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली मात्र योजनेचे काम हे कंत्राटदार संथगतीने करीत असून ते जलद गतीने करावे, सहा जलकुंभाचे काम जलदगतीने व्हावे, पाईपलाइन टाकण्याचे काम जलदगतीने व्हावे तसेच भोगावती नदीचे काम सुद्धा त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सांडपाणी प्रकल्प बंद आहे तो सुरू करण्यात यावा तसेच नागेश्वर तीर्थक्षेत्र मंदिराचे काम बंद आहे हे त्वरीत सुरू करण्यात यावे, सिद्धेश्वर नगरातील घरकुल जागा मोजणीचे पैसे त्वरीत पूर्ण भरण्यात यावे तसेच अक्सा नगरातील शौचालयांची त्वरीत दुरुस्त करावी, वरणगाव शहरात संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी, जनहिताच्या मागण्यांबाबत दखल घेण्याचे आश्वासन दिले तसेच भोगावती नदीचे काम सुद्धा दहा दिवसांच्या आत सुरू करण्यासह पाणीपुरवठा योजनेचे संदर्भात कंत्राटदाराला पाण्याच्या टाक्या त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले जातील व पाईप लाईन सुद्धा त्वरीत पूर्ण करून घेण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मुख्याधिकारी समीर शेख यावेळी म्हणाले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, शेख युसूफ, सरचिटणीस गोलू राणे, ज्ञानेश्वर घाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, माजी सरपंच सुभाष धनगर, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक साबी कुरेशी, मुस्लिम भाई अन्सारी, गजानन वंजारी, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील, संगीता माळी, नीता तायडे, मनीषा माळी, मंदा थटार यांच्यासह दत्तू मराठे, कमलाकर मराठे, कैलास पाटील, रमेश पालवे, नाना चौधरी, योगेश माळी, कृष्णा माळी, संदीप माळी, इरफान पिंजारी, राहुल जंजाळे, डॉ.प्रवीण चांदणे, भाजयुमोचे पप्पू ठाकरे, आकाश निमकर, गणेश चौधरी, अनिल वंजारी, रामेश पालवे उपस्थित होते.


