मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट : आठ आरोपींना बेड्या


पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड (Pimpari Chinchwad Police) पोलिसांची झटापट झाली. यानंतर आठ आरोपींना पोलिसांनी बेड्या ही ठोकल्यात पण आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे. यात एक पोलीस गंभीर जखमी झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशची ही टोळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला होता. मुंबईवरून पुण्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन संशयित वाहन टोलनाक्यावर आली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली मात्र तरीदेखील पोलिसांनी मार्गावरून हटले नाहीत. शेवटी पोलिसांच्या अंगावर त्यांनी वाहन घातलं आणि गाडीतून उतरत ते डोंगरात पसार झाले. तत्पूर्वी आठ आरोपींना पोलिसांनी जागेवर अटक केली तर चौघे डोंगराळ परीसरात लपून बसले. यात एक पोलीस जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !