भुसावळातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
भुसावळ : शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये दलित वस्ती नागरी सुधार योजनेंतर्गत काँक्रिटीकरण कामाचा नुकताच शुभारंभ माजी नगरसेवक उल्हास पगारे यांच्याहस्ते करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून दादासाहेब रूपवते हौसिंग सोसायटी, आंबेडकर नगर, राहुल नगर या भागात रस्त्यांअभावी नागरीकांना मोठे हाल सोसावे लागत होते मात्र या भागाचे माजी नगरसेवक उल्हास पगारे यांच्या प्रयत्नाने या भागात विकासकामांना सुरूवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी रवींद्र भालेराव, मुस्ताक मेंबर, एस.झेड.गवळी, दिलीप मोरे, शांताराम जाधव, संगीत खरे, बंटी बॉस, दीपक दीपके, समाधान निकम, सचिन इंगळे, विद्यासागर खरात, प्रशांत घुसळे, सिद्धार्थ पगारे, प्रवीण आखाडे, रवींद्र घटवाडवे आदींची उपस्थिती होती.


