अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीची हत्या : नंतर केलेले कृत्य वाचून धक्काच बसेल !


नवी दिल्ली : अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीची महिलेने प्रियकराला सोबत घेत हत्या केली. मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. एका महिलेने आधी आपल्या प्रियकरला घरी बोलवलं आणि आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर पतीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर प्रियकरासोबत शारीरीक संबंध ठेवल्याची बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा संशय ठरला खरा
30 वर्षीय मृत तरूणाचे नाव राम दिनेश मीणा असं आहे. राम दिनेश मीणाची हत्या त्याच्या घरात घुसून करण्यात आली. पोलिसांना हत्येप्रकरणी आधी त्याच्या पत्नीवर संशय होता. जो नंतर खरा ठरला. पोलिसांना घरात एक तुटलेला मोबाइल सापडला.ज्याबाबत पोलिसांनी मृत तरूणाच्या पत्नीला विचारणा केली. पण तिने एकही बरोबर उत्तर दिलं नाही त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्यानंतर पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली तेव्हा तिने सगळं खरं सांगितलं. नंतर महिलेने आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येची पूर्ण कहाणी सांगितली.

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा काढला काटा
आरोपी महिला ज्योतिचे गावातीलच एक व्यक्ती चैन सिंह याच्यासोबत अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. चैन सिंहने ज्योतिला एक मोबाइल फोन दिला होता. ज्यावर ते नेहमीच बोलत होते. एक दिवस पतीने ज्योतिला मोबाइलवर बोलताना पाहिलं आणि रागात त्याने मोबाइल तोडला. त्यानंतर त्याने पत्नीला रागावलं. याच रागातून पत्नीने हे भयानक हत्याकांड घडवून आणलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !