भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत उत्पादन प्रदर्शनाला प्रतिसाद
भुसावळ : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव व 26 जानेवारी रोजी गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून भव्य उत्पादन प्रदर्शनी भरवण्यात आली. त्याचे उद्घाटन महाप्रबंधक वसंत निमजे यांनी फीत कापून व दीपप्रज्वलन करून केले. निमजे म्हणाले की, ऑर्डनन्स फॅक्टरीतील दारू-गोळ्याचे पॅकिंग उत्पादन हे देशाच्या इतर संरक्षण क्षेत्रातील फॅक्टरीला दिले जातात व त्यात दारूगोळा भरून भारतीय सेनेला त्याचा पुरवठा होतो.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या वेळी ऑर्डनन्स फॅक्टरीतील सर्व वरीष्ठ अधिकारी-कर्मचारी सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यसमिती सदस्य जे.सी.एम.थ्री व फोर्थ चे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी दीपशिखा महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती निमजे व त्यांची सर्व कार्यकारणी शिक्षक वृंदांनी प्रदर्शनीला भेट दिली. दरम्यान, ही प्रदर्शनी 27 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुली राहणार असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


