विवाहितेची आत्महत्या : आरोपी पतीचा जामीन फेटाळला


भुसावळ : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील आरोपी पतीने जामिनासाठी अर्ज केला असता भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.आर.एम.जाधव यांनी तो फेटाळून लावला आहे. मनीषा गौरव तायडे या विवाहितेचा मुलगाचा हवा म्हणून सासूसह पती गौरव भीमराव तायडे यांनी छळ केला होता व या छळाला कंटाळून विवाहितेने 2 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली होती. आरोपी पतीने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तो भुसावळ न्यायालयाने फेटाळून लावला. या मूळ फिर्यादी वडिलांतर्फे अ‍ॅड.कृष्णा आर.सिंग यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड.देशपांडे यांनी युक्तीवाद केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !