वरणगाव शिवसेनेच्या दणक्याने निकृष्ट पुलाचे काम अखेर बंद
वरणगाव-दर्यापूर रस्त्यावरील महात्मा फुले नगराजवळील सुरू होते काम
वरणगाव : वरणगाव ते दर्यापूर महात्मा फुले नगराजवळील पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने वरणगाव शहर शिवसेनेने हे काम बंद पाडून ईस्टीमेटप्रमाणे दर्जेदार काम करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे संबधित ठेकेदाराला शनिवारी देण्यात आला.
निकृष्ट काम अखेर बंद
वरणगाव फॅक्टरी रस्त्यावरील महात्मा फुले नगरमार्ग दर्यापूर महामार्गावर जाणार्या मुख्य रस्त्यावरील पाण्याच्या हौदाजवळ पुलाचे काम सुरू आहे परंतु या पुलाचे काम अतिशय निकृष्टपणे सुरू असल्याची माहिती तेथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांच्या निदर्शनास आणून दिली.
शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरप्रमुख संतोष माळी यांच्यासह विलास मुळे, हिप्पी शेठ, निलेश ठाकूर यांनी प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेल्या पुलाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट पद्धतीने त्या पुलाचे काम सुरू असल्याचे दिसून आले. जे मोठे पाईप टाकले गेले आहे ते एस्टीमेट प्रमाणे टाकण्यात आलेले नाही शिवाय आधी त्या ठिकाणी पूर्वीपासून असलेला नाला सहा फूट खोल रुंदीचा होता पण आता तो पूर्णपणे मातीने बुजला गेला असून नवीन टाकलेले पाईप हे खाली टाकले असल्याने त्या पाईपाची उंची खाली स्लॅप टाकून वाढविण्यात यावी. तसेच जोपर्यंत हा पुल होत नाही तोपर्यंत बाजूच्या रस्त्यावर खडी टाकून रस्ता पक्का करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या.
ईस्टीमेटप्रमाणे करावे काम
या पुलाचे काम चांगले ईस्टीमेटप्रमाणे करावे अन्यथा शिवेसेनेतर्फे हे काम पूर्ण बंद पाडण्यात येईल, असा इशारा वरणगाव शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष माळी यांच्यासह दक्षिणचे शहर प्रमुख निलेश ठाकूर, जिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक नेते हिप्पी शेठ,सईद मुल्लाजी, शहर संघटक भूषण चौधरी, शेख सुफियान, राहुल वंजारी, सागर वंजारी यांनी यावेळी दिला.


