17 वर्षीय युवतीवर गँगरेप


पेन : 17 वर्षीय युवतीला धमकी देऊन ब्लॅकमेल करून काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पेण तालुक्यामध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सात आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे तर तीन आरोपीचा शोध सुरू आहे. या बाबत वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आधी प्रेम नंतर केले ब्लॅकमेलिंग
पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरात राहणारी दहावीपर्यंत शिकलेली 17 वर्षीय युवती शेजारीच असलेल्या वाशी गावाच्या परीसरात एका हळद समारंभासाठी गेली होती. या ठिकाणी या युवतीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करीत होते. मागील अनेक महिन्यांपासून नराधमांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात सुमारे पंधरा हून अधिक जण सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे.

तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती
दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोनाली कदम या उपविभागीय पोलिस अधिकारी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फरार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !