‘पुष्पा स्टाईल’ रक्तचंदनाची तस्करी पकडली : अडीच कोटींचे रक्तचंदन जप्तीने खळबळ
सांगली : आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात दाखल झालेल्या 1 टन वजनाच्या आणि सुमारे दोन कोटी 45 लाख 85 हजारांचे रक्तचंदन मिरजेत पोलिस आणि वन विभागानं धाड टाकून पकडल्याने खळबळ उडाली असून संशयीत यासीन इनायतउल्ला खान याला अटक करण्यात आली.
“पुष्पा स्टाईल’ चर्चेत
सध्या पुष्पा चित्रपटाचा सर्वदूर डंका वाजत असून त्यातून होत असलेल्या चंदनाच्या तस्करीमुळेदेखील चित्रपत्र चांगला चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे द्राक्ष वाहतूकीस चाललो, असं सांगून जात असलेला टेम्पो के.ए.13-6900 ची तपासणी केली असता टेम्पोमध्ये वरती क्रेट टाकून खाली रक्तचंदनाचे 32 ओंडके ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 2 कोटी 85 लाख 45 हजारांचे रक्तचंदन असल्याचं निदर्शनास आलं. हे रक्तचंदनच आहे, याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आणि वन विभागानं ते सर्व ओंडके ताब्यात घेतले. हे रक्त चंदन नेमकं आलं कुठून? याचा तपास सांगली पोलिस करत आहेत.

