मोठा दिलासा : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात
मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ९१.५ रुपयांनी कपात करण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात केली आहे मात्र घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’ आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
दर कपातीमुळे दिलासा
भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठीचे घरगुती गॅसचे दर जारी केले आहेत. त्यानुसार विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात एलजीपी सिलिंडरच्या दरात १०२.५० रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर तेच आहेत. त्यात बदल झालेला नाही. गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या १ तारखेला जाहीर होतात.



